*कोकण Express*
*बांदा चेकपोस्टवर साडे तीन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त….*
*मध्यरात्री पोलिसांची कारवाई; उत्तर प्रदेश येथील एक ताब्यात, एकूण ८ लाखाचा मुद्देमाल…..*
*बांदा ः प्रतिनिधी*
पोलीस चेकपोस्टवर गोव्यातून वसईकडे होणार्या बेकायदा दारु वाहतुकीवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुचे ३४ बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणे ३ लाख ४० हजार २०० रुपये किंमत आहे. तसेच सुमारे ८ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ११ लाख ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी रशीद रहिद मोहम्मद (३१, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारु वाहतुकीसाठी वापरलेला आयशर टेम्पोही (एमएच ०४ एफजे ९७६३) जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई शुक्रवारी मध्यरात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी धनंजय गोळे व विजय जाधव यांनी केली.