*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर सर्वात जास्त; सत्ताधाऱ्यांच्या श्रेयासाठी फक्त आढावा बैठका*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची संतप्त टीका*
*फक्त ३५ व्हेंटिलेटर बेड असतांना ७७ व्हेंटिलेटर आहेत अशी खोटी माहिती का देता?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारीत लोक मारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.जिल्हात ऑक्सिजन नाही म्हणून रुग्ण दगावतात आणि सत्ताधारी आजी-माजी पालकमंत्री ,शिवसेना खासदार,आमदार जनतेला खोटी माहिती देऊन दिशाभूल करतात. जिल्हात फक्त ३५ व्हेंटिलेटर बेड सुरू असतांना ७७ व्हेंटिलेटर बेड असल्याची खोटी माहिती प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली देते.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ८ व सावंतवाडी रुग्णालयात १० असे १८ व्हेंटिलेटर बेड आजही बंद आहेत.तर जिल्हा रुग्णालयात नादुरुस्त झालेले व्हेंटिलेटर बेड दुरुस्तीविना पडून आहेत, हे माहीत नसलेले पालकमंत्री आपल्या डोंबलाच्या आढावा बैठका घेतता काय ? असा संतप्त सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकारांशी बोलत होते.
आज कोरोनाचा रुग्ण उपचारासाठी कोठे न्यावा हे नातेवाईकांना कळत नाही सर्वत्र धावा धाव सुरू आहे.त्यासाठी माहिती केंद्र सुरू करून कोणत्या रुग्णालयात बेड खाली आहे ती माहिती देणे गरजेचे आहे म्हणजे रुग्ण थेट तेथे नेला जाऊ शकेल. जागा नसल्याने रुग्ण सर्वत्र फिरवला कतो आणि वाटेत दगावतो ही स्थिती पालकमंत्री आणि सत्ताधारी नेत्यांना कळत नाही काय ? पालकमंत्री मात्र आढावा बैठका घेऊन एका दुसऱ्याची पाट थोपटून घेत आहेत. हे राजकारणाचे आणि श्रेय घेण्याचे दिवस नाहीत तर सर्वांचे सहकार्य घेण्याचे दिवस आहेत मात्र सत्ताधारी शिवसेना स्वतःच्या कैतुकात मग्न आहे.त्यांना लोक मरतात याचे काही देणे घेणे नाही. खोटी माहिती देऊन आपण खूप मोठे काम करत असल्याचे ते भासवत आहेत. सर्वात जास्त मृत्यू दार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे.याची जाणीव प्रशासनाला नाही आणि सत्ताधाऱ्यांना असून काय करावे हे कळत नाही.त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे, राज्याचे मुख्य सचिव,तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुरेश प्रभू याना पत्रलिहून मृत्युदर थांबण्यासाठी स्टार्स फोर्सचे मार्गदर्शन जिल्ह्यातील डॉक्टर आणि प्रशासनाला केले जावे अशी मागणी केली आल्याचेही राजन तेली यांनी सांगितले.
माजी पालकमंत्री केसरकर गोव्यातून ऑक्सिजन आणणार म्हणून सांगता तर गोव्याला कोल्हापूर मधून ऑक्सिजन जातो अशा माध्यमातून बातम्या येतात म्हणजे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करता काय ?जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचयत आणि प्रत्येक ग्रामपंचायत या कोरोना लढ्यात अग्रेसर आहे मात्र त्याचा कोठेही उल्लेख सेनेचे सत्ताधारी करत नाही स्वताच सर्व करत आल्याचे भासवतता.आज जिल्हाला मदत करणाऱ्यांची गरज आहे.जेव्हा माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांना कोविड रुग्णालयात बेड वाढवावेत अशी विंनती जिल्हाधिकाऱ्यांनी केली तेव्हा पडवे व्हास्पिटल मध्ये त्वरित शंभर बेड वाढविले, आमदार नितेश राणे ऑक्सिजन पुरवठा करत आहेत अशा मदतीची गरज आतांना सत्ताधारी विरोधकांना डावलून स्वतःच गोधळाचा कारभार करत आहेत अशी टीका राजन तेली यांनी केली.
सिंधुदुर्गातील ५० हजाराहून अधिक नागरिक लसीकरणाच्या दुसर्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. मुंबई, ठाणे, पुणे येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्ट्राँग असल्याने तेथे जास्तीत जास्त लस उपलब्ध होतेय. पण पालकमंत्र्यांचे तेवढे राजकीय वजन नसल्याने सिंधुदुर्गातील नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. सिंधुदुर्गात ४ हजार पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यातील गंभीर रुग्णांना बेड साठी धावाधाव करावी लागतेय. पण नेमके कुठे बेड शिल्लक आहेत. याची माहितीच मिळत नाही. त्यामुळे सिंधुदुर्गात कंट्रोल रूम तयार करून बेड शिल्लक असल्याचे अपडेट रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मिळायला हवी अशी व्यवस्था करा.अशी मागणी श्री तेली यांनी केली.