‘पी आर ओ’ म्हणून विजय विर यांची नियुक्ती

‘पी आर ओ’ म्हणून विजय विर यांची नियुक्ती

*कोकण  Express*

*’पी आर ओ’ म्हणून विजय विर यांची नियुक्ती…*

*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या मागणीची तात्काळ दखल…*

*सिंधुदुर्गनगरी*

भूमी अभिलेख अधीक्षक विजय वीर हे पी आर ओ म्हणून नियुक्ती केली आहे. कोणत्याही रोगाच्या साथी चे संकट जेव्हा-जेव्हा आले तेव्हा तेव्हा चुकीची माहिती व पसरविल्या जाणाऱ्या अफवा अशा संकटाशी लढण्यासाठी अडथळा ठरलेल्या तिचे लढताना अशा अफवा चुकीची माहिती पसरवली जाते त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. या साथीच्या काळात पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मदत करू इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था यांना कोवीड साथीचेड  सध्याचे स्वरूप, उपायोजना, त्यामधील त्रुटी, मर्यादाा, सुविधांची वस्तुस्थिती सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. सध्या दिवसातून एक प्रेसनोट निघते आहे. परंतु ती पुरेशी नाही ऑक्सीजन,रेमडेसीवीर इंजेक्शन ,डॉक्टर यांच्या उपलब्धता जाणून घेण्यासाठी तसेच लसीकरणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी सर्वांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकार्‍याकडून घ्यावी लागते. त्यामुळे या अधिकाऱ्यासमोर रुग्णांना वाचवायचे की माहिती देण्यासाठी फोन स्वीकारायचे असा प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे ही सर्व माहिती देणारा ‘पीआरओ’ (पब्लिक रिलेशन ऑफिसर ) तातडीने नेमणे आवश्यक आहे असा अधिकारी नेमला तर पत्रकारांना लोकप्रतिनिधींना व इतरांना सर्व माहिती मिळू शकेल तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना ही रुग्णांचा स्टेटस काय आहे याची माहिती ‘पीआरओ’ कडून मिळण्यास मदत होईल. यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी पी आर ओ यांची मागणी केली होती.

‍  जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविल्यानंतर तातडीने दखल घेत त्यांनी पी आर ओ म्हणून विजय विर यांच्याकडे जबाबदारी सोपवत असल्याचे सांगितले.

सन्मानीय वीर हे पूर्वीपासूनच माहिती गोळा करणे व पुरविण्याचे काम करतच होते त्यांच्याकडे आता अधिकृतरित्या जबाबदारी देण्यात आली असून ते pro म्हणून काम करणार आहेत आपल्याला कोणतीही माहिती हवी असल्यास 9881979292 हा त्यांचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क साधा त्यांच्याकडे माहिती असेल तर ते तुम्हाला तात्काळ देतील मात्र माहिती नसेल तर मात्र संबंधित यंत्रणेकडून किंवा अधिकाऱ्यांकडून ते माहिती घेऊन तुम्हाला पुरवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!