वेळेचे भान राहण्यासाठी सायरन, स्पीकरद्वारे केली जातेय जाणीव

वेळेचे भान राहण्यासाठी सायरन, स्पीकरद्वारे केली जातेय जाणीव

*कोकण  Express*

*नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी पालिकेच्यावतीने आजपासून शहरात सायरन वाजवून  स्पीकरद्वारे कोरोना जनजागृती*

*मालवण न प चा उपक्रम;मुख्याधिकारी जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत*

*मालवण ः प्रतिनिधी*

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेतच सुरू ठेवण्यास शासनाने मुभा दिली आहे. या काळानंतरही दुकाने अन्य व्यवसाय सुरू असल्यास ते बंद ठेवावेत. नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी पालिकेच्यावतीने आजपासून शहरात सायरन वाजवून व स्पीकरद्वारे कोरोना जनजागृती करत प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे पथक बाजारपेठ मार्गावर फिरून जनजागृती केली जात आहे. नगरपालिकेच्या या आवाहनाला व्यापार्‍यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आजपासून कडक निर्बंध लागू केल्यानंतर सकाळी अकरा वाजल्यानंतर बाजारपेठेसह शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान शहरात गस्त घालून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत. विनाकारण फिरणार्‍यांवर तसेच नियम मोडणार्‍यांवर पोलिस व पालिका प्रशासनाच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!