*कोकण Express*
*कणकवली शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला…*
सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दाटलेले अवकाळी पावसाचे मळभ अजूनही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. काल वैभववाडी येथे अवकाळी पावसाने असाच हाहाकार माजवला होता आणि आज तशीच स्थिती कणकवली परिसरात दिसून आली. कणकवलीसह, फोंडा, खारेपाटण, कनेडी, नांदगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हैदोस माजवला. त्यामुळे लोकांची भयंकर तारांबळ उडाली. बागयतदारांसह सर्वसामान्य नागरिकही या अवकाळी संकटामुळे ग्रस्त झाले आहेत. आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात परत अवकाळी पावसाचा घाला त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहिर’ अशी नागरिकांची अवस्था झाली आहे.

