इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकला-श्री वामन तर्फे

इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकला-श्री वामन तर्फे

*कोकण Express*

*इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकला-श्री वामन तर्फे*

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रविवार दिनांक २३/५/२१रोजी आयोजित केलेली शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकलावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मा.शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या कडे मेलद्वारे पत्र पाठवून केली असल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे.बारावीच्या परिक्षेबाबत अनिश्चितता आहे.IIT,NEET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.असे असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते असे मत श्री वामन तर्फे व श्री गुरुदास कुसगांवकर यांनी व्यक्त करुन शिष्यवृत्ती परीक्षा तुर्तास पुढे ढकलावी अशी आग्रही मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!