*कोकण Express*
*सत्ताधाऱ्यांनी जिल्हावासियांच्या आरोग्याचा खेळ खडोबा थांबवून काम करावे-:अनिषा दळवी…*
शासनाने 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केलं लसीकरण केंद्रांवर गेल्यावर लस उपलब्ध नाही असे बोर्ड झळकत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७५००० हजार कोविशिल्ड व ५०००० हजार कोव्हक्सिन लसींचे लाभार्थी दुसऱ्या डोससाठी प्रलंबित आहेत.जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हॅटीलेटरवर जात असताना शासन स्तरावरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे.त्यामुळे शासनाने पर्यायाने सत्ताधाऱ्यांनी जिल्हावासियांच्या आरोग्याचा चालवलेला खेळ खंडोबा थांबवून नुसत्या घोषणा न करता वस्तुस्थिती पाहून काम करावे अशी मागणी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिषा दळवी यांनी केली आहे.