जिल्ह्यात नव्याने ३३८ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नव्याने ३३८ पॉझिटिव्ह

*कोकण  Express*

*जिल्ह्यात नव्याने ३३८ पॉझिटिव्ह*

*आज नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू*

*डॉ.श्रीपाद पाटील ; ३ हजार ८७६ सक्रिय रुग्ण*

*सिंधुदुर्गनगरी,ता.०६:*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ८२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान आज नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आणखी ३३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

मृतांमध्ये ओवळीये-मालवण येथील ५७ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोग व फुफ्फुसविकाराचा त्रास होता.वाडा-देवगड येथील ५४ वर्षीय पुरुष आहे.त्याला मधुमेह त्रास होता.देवगड येथील ४७ वर्षीय महिला आहे.तिला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.हळदिचे नेरुर-कुडाळ येथील ६८ महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.सडुरे-वैभववाडी येथील ४५ वर्षीय पुरुष होता.त्याला हृदयरोगचा त्रास होता.आचरा-मालवण येथील ७१ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोग,उच्चरक्तदाब व पक्षाघात चा त्रास होता.सडुरे-वैभववाडी येथील ४५ वर्षीय पुरुष होता.त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. आरोंदा-सावंतवाडी येथील ७९ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदयरोग,उच्चरक्तदाब व मधुमेह चा त्रास होता.कोलगांव-सावंतवाडी येथील ६२ वर्षीय महिला आहे.तिला हृदयरोग व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!