जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन

*कोकण Express*

*जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन…*

*आमदार नितेश राणे यांनी रस्ता काम करून देण्याचे दिले होते आश्वासन*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

ओसरगाव बौद्धवाडी अपराधवाडी-परबवाडीकडे जाणाऱ्या धरण ब्रीजकम रस्ता कामाचे भूमीपूजन जि.प.माजी अध्यक्ष संदेश (गोट्या ) सावंत यांच्या हस्ते करण्यात आले .हा रस्ता होण्यासाठी ओसरगाव माजी संरपंच सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी उपोषण आंदोलन छेडले होते.याची दखल घेतआ.नितेश राणे यांनी रस्ता काम करून देण्याचे आश्वासन दिले होते . आता या रस्त्याचे भूभीपूजन झाल्याने बबली राणे यांच्या उपोषण आंदोलन लढ्याला यश प्राप्त झाले असून ओसरगाव बौद्धवाडी ,अपराधवाडी,परबवाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.रस्ता काम भूमीपूजना वेळी पं.स.सदस्य मिलिंद मेस्त्री ,सामाजिक कार्यकर्ते बबली राणे ,ग्रा.प.माजी सदस्य सुदर्शन नाईक ,भगवान आलव ,प्रभाकर सावंत ,संदेश राणे व बौद्धवाडी ,अपराधवाडी ,परब वाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!