जनता कर्फ्यू” च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत कडकडीत बंद

जनता कर्फ्यू” च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत कडकडीत बंद

*कोकण  Express*

*जनता कर्फ्यू” च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत कडकडीत बंद…*

*नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शहरात पोलिस बंदोबस्त*

*वेंगुर्ला ः  प्रतिनिधी* 

वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये ४४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईंणकर यांनी दिली. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेंगुर्लावासियांकडून आज पासून सुरु करण्यात आलेल्या “जनता कर्फ्यू” ला उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. वेंगुर्ले शहर एरियात ८ व्यक्ती, शिरोडा २, आडेली ७, खानोली १, उभादांडा ५,परबवाडा ६, मधला परबवाडा २,मातोंड ३,वायंगणी ३, तुळस ६ व पाल १ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह ४४ व्यक्ती आढळून आल्या आहेत. दरम्यान शहरातील मुख्य नाक्यावर व प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू होती. आमदार दीपक केसरकर व प्रशासनाकडून केलेल्या आवाहनानंतर वेंगुर्ले मध्ये आज पासून कडक जनता कर्फ्यू पाळण्यात आला.आज पासून दहा दिवस त्याची अंमलबजावणी होणार. शहरातील पेट्रोल पंप व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!