*कोकण Express*
*सावंतवाडीत १२ तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन*
*युवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे ला सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै. सभागृहाच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या युवकांनी पुढील क्रमांकावर संपर्क करून प्रथम नाव नोंदणी करावी जेणे करून रक्तदान करते वेळी त्या ठिकाणी गर्दी होणार नाही,असे आवाहन केले आहे.
सध्या राज्यात १८ ते ४४ वयोगटातील युवकांना लसीकरण सुरू करण्यात आले असून,या वयोगटातील युवकांनी लस घेतल्यानंतर ते ६० दिवस रक्तदान करू शकत नाहीत.त्यामुळे पुढील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी देव्या सूर्याजी – ९९२२०८८२३८, अनिकेत पाटणकर – ८६००७४१७४२, मेहर पडते – ९७६५७२७०२५, मंगेश तळवणेकर – ९४२१२६९४४४, जतिन भिसे – ९४२३५१३१७२, प्रसन्ना राणे – ९३०५२७८६९६, प्रवीण मांजरेकर – ९४२११९०३०२, रामचंद्र कुडाळकर – ९७६३७१७७६१. या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.