*कोकण Express*
*पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसेचा भाजपकडून निषेध…*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यात जबरदस्त हिंसाचार सुरू असून भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत असल्याने, सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने त्याचा निषेधार्थ करण्यात आला असून, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदनात त्यानी असे म्हंटले की, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संतप्त कार्यकर्ते शांततामय पद्धतीने हे निवेदन सादर करत असून, परंतु सुरू असलेल्या या घटना बाबत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून, प्रशासनाचे प्रमुख म्हणून या भावना संबंधितांपर्यंत त्वरित कळवाव्यात अशी विनंती केली आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यात ही याचे तीव्र पडसाद उमटतील आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील त्यानी यावेळी दिला आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.