*कोकण Express News
*जनता कर्फ्यू”च्या पार्श्वभूमीवर दोडामार्गात खरेदीसाठी तोबा गर्दी*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
तालुक्यात उद्यापासून “जनता कर्फ्यू” लावण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर आज खरेदी करण्यासाठी दोडामार्ग बाजारपेठेत मोठी गर्दी झाली.यात स्थानिक नागरिकांपेक्षा गोवा राज्यातील नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.उद्यापासून दहा दिवस हा जनता कर्फ्यू असणार आहे.त्यामुळे सोशल डिस्टंसिंग आणि खरेदी यात कुठेही ताळमेळ दिसत नव्हता. जो-तो आपल्याला साहित्य मिळावे यासाठी गर्दी करताना दिसत होता.