आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर वाटप.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर वाटप.

*कोकण  Express*

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर वाटप..*

*संघटनेचे पदाधिकारी ॲड.मोहन पाटणेकर,बाळा कोरगांवकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोशियनच्या मार्फत माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर.वाटप करण्यात आले.
संघटना समाज हीतासाठी नेहमीच समाजकार्यात कार्यरत असते.संपूर्ण देशावर आलेले कोरोनाशी संकटाला लढा देण्यासाठी अहोरात्र सर्व शासकीय यंत्रणा मेहनत घेत असते. हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टर,नर्स,वाॅडबाॅय, दिवस-रात्र रुग्णांची सेवा बजावत असतात. योद्धांची काळजी घेणे काळाची गरज आहे.त्यातच माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी ॲड.मोहन पाटणेकर ,बाळा कोरगांवकर माध्यमातुन सॅनिटायझर,हॅन्ड ग्लोज आरोग्य केंद्राचे (क्लास वन) वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील, डॉ.राहुल गव्हाणकर,सौ.घाडी,सौ.अणावकर यांच्याकडे सुपूत करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर,महिला जिल्हा अध्यक्षा सौ.दर्शना केसरकर,सौ.सुप्रिया पाटणेकर,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी,अमित देसाई, पांडुरंग खरात,अक्षय खरातआदी पदाधिकारी उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मानवधिकार वेल्फेअर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!