*कोकण Express*
◾ *ऑनलाईन क्लास घेणाऱ्या ! – शाळांनी फी कमी करा – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश*
◾ तुम्हाला माहिती असेल सध्या, देशात विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जात आहे – तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली जात आहे.
◾ दरम्यान यावर आता सर्वोच्च न्यायालयाने – अशा ऑनलाईन क्लास घेणाऱ्या शाळांना – फी कमी करण्याचे आदेश दिलेत
◾ *काय सांगितले सर्वोच्च न्यायालयाने*
🔰 सर्वोच्च न्यायालयाने सांगितले – शाळा बंद असल्याने ज्या सुविधा शाळा सध्या देऊ शकत नाहीत – अशा सुविधांचे शुल्क शाळांनी आकारणे बंद करावे
🔰 शाळाच सुरु नसल्याने वीज, पेट्रोल, डिझेल, मेन्टेनन्स कॉस्ट, पाण्याचे शुल्क, स्वच्छता शुल्क आदींवरील खर्च वाचला आहे – असे न्यायालयाने म्हटले आहे.
🔰 शाळांचा अतिरिक्त खर्च होत नसल्यानी – शाळांनी विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या फी मध्ये कपात करावी – अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत.
🔰 *सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना* – विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाच्या आहेत – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.