जाणवलीतील वाकडवाडी येथील छेद फाटा बंद करा; सुजित जाधव

जाणवलीतील वाकडवाडी येथील छेद फाटा बंद करा; सुजित जाधव

*कोकण Express”

*जाणवलीतील वाकडवाडी येथील छेद फाटा बंद करा; सुजित जाधव*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत जाणवलीतील वाकडवाडी येथे असलेल्या ‘त्या’ फाटा येथे काही दिवसा पूर्वी अपघात होऊन डॉ. नाटळकर हे अपघाती मयत झाले होते. हा अपघात होण्यापूर्वी सुद्धा तिथे वारंवार अपघात होत असून भविष्यात असे अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच सदर छेद रस्त्याला लागून कोणत्याही ग्रामीण भागाला जोडणारा जोड रस्ता नाही त्यामुळे त्या आणि त्या सारखे अन्य अनावश्यक छेद रस्ते बंद करावेत. जेणे करून पुढील काळात अपघात होणार नाही. तसेच छेद रस्ता बंद करण्याबाबत वेळोवेळी हायवे ठेकेदार यांस समज देऊन सुद्धा दुर्लक्षित करत आहेत. तरी डॉ. नाटळकर यांच्या अपघाती मृत्यूस संबंधित अधिकारी, हायवे प्राधिकरण, ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच यापुढे अशा प्रकारचे छेद बंद रस्ते न केल्यास त्या मुळे होणाऱ्या अपघातास संबंधित अधिकारी, हायवे प्राधिकरण , ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांनी कणकवली प्रांताधिकारी यांच्या जवळ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!