खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी

खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी

*कोकण Express*

*खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी*

*खारेपाटण  ः प्रतिनिधी*

​सिंधुदुर्ग जिल्हयातील खारेपाटण बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण या बँकेच्या बाहेर आज बुधवारी सकाळी ​१०:३० वाजता ग्राहकांची मोठी गर्दी वाढली होती.तर सोशल ​​डिस्टसिंगचा यामुळे पुरता फज्जा उडालेला दिसत होता.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याला रोखण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाजारपेठा बंद ​ठेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या​ ​करिता शासन प्रयत्न करत आहे. मात्र खारेपाटण बाजारपेठ येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील आजची ग्राहकांची गर्दी ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी अनुकूल अशीच होती.
महिन्याचा पहिला आठवडा असल्याचे तसेच शासन नियम नुसार बाजारपेठा या सकाळी ​११ पर्यंतच सुरू असल्याने खारेपाटण बाजारपेठे मध्ये बँकेच्या पेन्शनर ग्राहकांची गर्दी वाढणे हे स्वाभाविकच आहे. मात्र नागरिकांनी कोणतीच सोशल ​​डिस्टसिंग​​ची काळजी घेतलेली दिसत नव्हती. बँकेच्या बाहेर नागरिकांची व ग्राहकांची भली मोठी रांग लागलेली दिसत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!