वेंगुर्ला तालुक्यातही ६ मे ते १५ मे पर्यंत जनता कर्फ्यु

वेंगुर्ला तालुक्यातही ६ मे ते १५ मे पर्यंत जनता कर्फ्यु

*कोकण Express*

*वेंगुर्ला तालुक्यातही ६ मे ते १५ मे पर्यंत जनता कर्फ्यु….*

*तातडीच्या बैठकीत घेतला निर्णय*

*वेंगुर्ला ः  प्रतिनिधी

मा आमदार दिपकभाई केसरकर साहेब यांनी आज तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत 6 मे ते 15 मे पर्यन्त जनता कर्फ्यु लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत , त्यामुळे या दोन दिवसात नागरिकांनि आपली अत्यावश्यक खरेदी करून घ्यावी. बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा पुढील 2 दिवस संध्याकाळ पर्यन्त सुरू ठेवता येतील, सकाळी 6 ते 9 दूध विक्री सुरू राहील, मेडिकल व दवाखाने सेवा लोकडाऊन कालावधीत सुरू राहतील , कोरोना नियमभंग झाल्यास पोलीस खात्या मार्फत कारवाई  होणार आहे, ट्रान्सपोर्ट सुरू राहतील, बांधकाम सुरू राहील. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर RTPCR टेस्ट केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!