बाबूराव धुरीनी करावी भंपकबाजी बंद

बाबूराव धुरीनी करावी भंपकबाजी बंद

*कोकण  Express*

*बाबूराव धुरीनी करावी भंपकबाजी बंद…*

*तिलारी प्रकल्प रस्ते प्रश्नावरून प स सदस्य बाळा नाईक यांचा प स सदस्य बाबुराव धुरींवर निशाणा*

*दोडामार्गगः प्रतिनिधी* 

तिलारी जलसंपदा विभागाने पर्यटन दृष्टया विकसित होणारा तेरवण मेढे उन्नेयी बंधारा,तिलारी मुख्य धरण, सँडल डॅमला जोडणाऱ्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण कामे येत्या आठ दिवसात निविदा प्रक्रिया राबवून सुरू करावीत अन्यथा जलसंपदा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा मलई कारभार उघड केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देणे म्हणजेच धुरीनी मलई कारभाराबाबत आपणांस असलेले ज्ञान तालुकावासियांसमोर मांडणे होय. असे म्हणत दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनाला चार चांद लावणाऱ्या तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यावर एमटीडीसी मधून कोट्यवधीचा पर्यटन प्रकल्प साकारत आहे.हा प्रकल्प चार चांद लावेल हे निच्छीतच,मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पाकडे जाणाऱ्या दोडामार्ग विजघर रस्त्याची काय अवस्था झाली आहे ते मलईच्या व्यवहारातून बाहेर आले असतील तर सत्ताधारी म्हणून धुरीनी पाहणे गरजेचे ठरते. असा सल्ला प स सदस्य लक्ष्मण गवस यांनी बाबुराव धुरी यांना दिला आहे. आज दोडामार्ग ते विजघर रस्त्यावरुन प्रवास करताना समस्त तालुकावासियांची अवस्था केविलवाणी होत आहे.या रस्त्यावरून गोव्यास जाणारे आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.मात्र रस्त्यामुळे धुरींच्या पर्यटन प्रकल्पाला सदरचे लोक किती पसंती देतील याचा अभ्यास धुरीनी केलेला बरा. असे सांगताना एमटीडीसी पर्यटन प्रकल्पाच्या रस्त्यांना प्राथमिकता देण्यापेक्षा तिलारी जलविद्युत प्रकल्पाकडे जाणारा रस्ता म्हणून दोडामार्ग विजघर रस्त्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला असता तर बरे झाले असते.पण या रस्त्याचा विचार धुरी करणार नाहीत कारण बांदा दोडामार्ग रस्त्याचे तुणतुणे वाजवूनही सत्ताधाऱ्यांच्या सरकारवरुन ठेकेदारांचा विश्वास उडाल्याने यांची कामे भरण्यास कोणीही तयार होत नाही.हे पूर्णपणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचे अपयश आहे, असा निशाणा बाळा नाईक यांनी साधला. आज कोरोना कालावधीत लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना, तिलारी परीसरातील गावात हत्तीप्रश्न जटील होत असताना दोडामार्ग विजघर मुख्य रस्ता सोडून जलविद्युत प्रकल्पावरील रस्ते करायला सांगणे तालुक्याचा स्वघोषित कैवारी समजणाऱ्या धुरींच्या स्वभावात बसते का ? कि केवळ मलईदार कामे करण्यासाठी तालुकावासियांच्या मुळ प्रश्नांपासून शिवसेना दूर पळत आहे हे धुरीनी स्पष्ट करावे. असा प्रश्न विचारून लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जवाबदारी एकतर शिवसेनेने घ्यावी, पालकमंत्र्यानी घ्यावी किंवा तालुकाप्रमुख म्हणून धुरीनी घ्यावी. असा घणाघात श्री नाईक यांनी केला ते पुढे म्हणाले मुख्य रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना या रस्त्याने पर्यटकांना आणून दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांचे प्रदर्शन मांडणाऱ्या शिवसेना नेत्यांनी थोडी तरी शरम वाटणे क्रमप्राप्त होते पण केवळ सत्तेच्या धाकाने जलसंपदा विभागाकडून मलईदार कामे काढून घेऊन आपली तुंबडी भरण्याचे काम धुरी करीत आहेत. फक्त तोडपाण्यासाठी आंदोलने करणे ही धुरींची जुनी सवय असून हिंम्मत असेल,सत्ताधारी असण्याची जाण असेल आणि जलसंपदा विभागाकडे प्रकल्पाकडे जाणारे रस्ते करण्यासाठी योग्य निधीची तरतूद असेल तर धुरींच्या पर्यटनस्थळास चार चांद लावणाऱ्या दोडामार्ग विजघर रस्तावरील तिलारी परीसरातील रस्ते तरी दुरुस्त करुन घ्या. असा सल्लाही त्यांनी दिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!