*कोकण Express*
*जिल्हा रूग्णालयात स्फोट झाला नाही,तर मोठा आवाज आला…*
*ऑक्सीजन सिलेंडर मधील उच्च दाबाने आत असलेल्या वायू बाहेर आल्याने मोठा आवाज*
*शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केलाय अधिकृत खुलासा*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
आज सोमवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले. याबाबत सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या अफवा पसरल्या. जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी याबाबत खुलासा केला आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील डेडिकेटेड कोव्हिड सेंटर साठी कार्यान्वित केलेली सेंटर ऑक्सीजन लाईन सिस्टीम आहे. त्यात दर तासाला दहा जम्बो ऑक्सीजन सिलेंडर बदलावे लागतात. त्यात २४ जम्बो सिलेंडर असतात व ते जोडण्यासाठी मॅनीफोल्ड लावलेले असतात. आज पहाटे दोन कनेक्टर जम्बो सिलेंडर लावत असताना सुटून सिलेंडर मधील कॉम्प्रेस गॅस (दाबामुळे) मोठा आवाज झाला. या आवाजामुळे सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. पण प्रत्यक्षात स्फोट झालेला नसून सेंट्रल ऑक्सीजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सीजन सिलेंडर जोडताना कनेक्टर योग्यप्रकारे घट्ट न बसवल्याने भरलेल्या ऑक्सीजन सिलेंडर मधील उच्च दाबाने आत असलेल्या वायू बाहेर आल्याने मोठा आवाज झाला होता. ऑक्सीजन सिलेंडर मधील वायू हा अज्वलनशील असल्याने कोणतीही इजा, गुदमरणे व जीवितहानी, स्फोट असला कोणताही प्रकार घडला नाही, असा खुलासा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी केला आहे.