लोकप्रतिनिधींनी तातडीने जिल्ह्याला प्लाझ्मा डोनेट मशीन उपलब्ध करून द्यावी

लोकप्रतिनिधींनी तातडीने जिल्ह्याला प्लाझ्मा डोनेट मशीन उपलब्ध करून द्यावी

*कोकण Express*

*लोकप्रतिनिधींनी तातडीने जिल्ह्याला प्लाझ्मा डोनेट मशीन उपलब्ध करून द्यावी…*

*युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांची मागणी*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोरोनाच वाढत संकट लक्षात घेता प्लाझमा हा त्या रूग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. मात्र, प्लाझमा डोनेट मशीनच जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने हा प्लाझमा मिळवणे एक अग्नी दिव्य बनले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तातडीने जिल्ह्यात प्लाझ्मा डोनेट मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कोरोनातून बरी झालेली त्याच रक्तगटाची व्यक्ती शोधताना रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. त्यात त्या व्यक्तीला कोरोनातून बर होऊन २८ दिवस होणे आवश्यक आहे. तर ४ महिन्यांच्या आतच ती व्यक्ती प्लाझमा डोनेट करू शकते. या सर्वातच जर डोनर मिळाला तर प्लाझमा डोनेट करण्याच मशिनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध नाही आहे. त्यामुळे रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. यात प्रचंड वेळ वाया जात असून रूग्णांची गैरसोय होत आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्ण दगावत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्लाझमा डोनेट करण्याच मशिन सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून द्याव, अन्यथा कुडाळ येथील महिला रूग्णालयात मंजूर झालेल्या नव्या रक्तपेढीत उपलब्ध करून द्याव अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे. जेणेकरून मशीनविना रुग्णांच्या नातेवाईकांचे, प्लाझमा डोनरचे होणारे हाल थांबतील, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचीही सोय होईल व अनेकांचे जीव वाचतील. तर आजच्या परिस्थितीत प्लाझमादाते उपलब्ध करण कठीण बनल असून त्यासाठी जिल्ह्यातील रक्तदाता पुढाकार घेत आहे अस मत देखील देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!