*कोकण Express*
*देवगड ग्रामीण रुग्णालयात कोव्हॅक्सिन घेतलेल्या त्या 689 नागरिकांचा प्रश्न गंभीर*
*आरोग्य विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांची गैरसोय*
*दुसरा डोस घेण्याची कमाल मुदत उलटून जाणार*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन डोस घेतलेल्या 45 वर्षावरील नागरिकांचा या लसीचा दुसरा डोस ग्रामीण रुग्णालयांमध्ये देण्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने नकार दिल्याने 689 लोकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा. अशी मागणी होत आहे. या नागरिकांचा डोस घेण्याची शेवटची कमाल मुदत उलटून जात असल्याने या लसीकरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
लसीकरण सुरू झाल्यावर कोविशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचा पुरवठा होत होता. देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये या दोन्ही लसी दिल्या गेल्या. मात्र नंतर अचानक या रुग्णालयात केवळ कोविशील्ड ही लस उपलब्ध होईल कोव्हॅक्सिन ही लस दिली जाणार नाही. असा तुघलकी निर्णय घेतला गेला. मात्र या रुग्णालयामध्ये 689 लोकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस या रुग्णालयात उपलब्ध नाही
यानंतर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध झाली होती मात्र ती ग्रामीण रुग्णालयाला न देता इतर उपकेंद्राला का देण्यात आली ? हा प्रश्नच आहे चौकशी करता देवगड ग्रामीण रुग्णालयाला कोव्हॅक्सिन लस न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उघड झाले
कोव्हॅक्सिन घेण्याची मुदत कमाल मुदत उलटून चालली आहे. मात्र अद्यापही डोस येत नाही. या नंतर मोठ्या प्रमाणात कोव्हॅक्सिन देवगड तालुक्यातील विविध उपकेंद्रात उपलब्ध होते.
मात्र आडमुठी भूमिका घेऊन ती देवगड ग्रामीण रुग्णालयाला दिली नाही. अशी आडमुठी भूमिका घेणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केले पाहिजे. अशी मागणी होत आहे.
काही नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुसऱ्या डोसचे लसीकरण केले. मात्र हे सर्वांना शक्य नाही. काही नागरिक सत्तर ते ऐंशी वर्षाचे आहेत त्यांना डोस कधी मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणा अशा नागरिकांशी किती क्रूरपणे वागत आहे. हे यातून दिसून येते.
या सर्व नागरिकांना तातडीने कोव्हॅक्सिन ही लस देवगड ग्रामीण रुग्णालयात दुसरा डोस घेण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी होत आहे.