कणकवलीत दुसऱ्या दिवशीही जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद

कणकवलीत दुसऱ्या दिवशीही जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद

*कोकण Express”

*कणकवलीत दुसऱ्या दिवशीही जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद*

*आजपासून नऊ दिवस  जनता कर्फ्यू यशस्वी करा नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन*

​*कणकवली ः प्रतिनिधी*

​कणकवली शहरात जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ला दुसऱ्या दिवशीही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. कणकवली शहरातील सर्व दुकाने बंद ठेवत दुकानदार व नागरिकांनी बंदला दुसऱ्या दिवशीही पाठिंबा देत कोरोना हद्दपारी चा निर्धार केला. कणकवली शहरातील रस्त्यांवर पहिल्या दिवशी असलेला शुकशुकाट दुसऱ्या दिवशी देखील कायम होता. कणकवली शहरात वाढती रुग्ण संख्या व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वाढलेले मृत्यूचे प्रमाण या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत राजकीय पक्ष व सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व्यापारी आणि सर्वानुमते दहा दिवसांच्या जनता कर्फ्यू चा निर्णय घेतला होता. दहा दिवसाचा जनता कर्फ्यू ​१ ते ​१० मे पर्यंत सुरू राहणार असून, पहिल्या दिवशी शहरवासीयांनी जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ​२ मे रोजी देखील ​१००% दुकाने बंद ठेवत व्यापारी व नागरिकांनी जनता कर्फ्यू यशस्वी करून दाखविण्याचे संकेत दिले. अगदी भाजीविक्रेत्या पासून अत्यावश्यक सेवेत असलेली किराणा दुकाने ही कडकडीत बंद होती. रविवार असून देखील मच्छी मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता. कणकवलीवासीयांनी व व्यापाऱ्यानी केलेल्या या सहकार्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली वासीयांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!