ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत दहा लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत दहा लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ

*कोकण  Express*

*ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत दहा लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ…*

*जिल्हा बँकचे अध्यश सतिश सावंत*

*सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या बँकेत पगार जमा होण्याऱ्या नोकरदारांसाठी विशेष लाभ देणारी ‘सिंधु बँक सॅलरी प्लस’ योजना दि. ०१ नोव्हेंबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात केली. या योजनेमध्ये सुलभ व कमी व्याजदर असणाऱ्या कर्ज सुविधेबरोबरच सामूहिक अपघात विमा पॉलिसीचा लाभ दिला जातो. नोकरदारांना त्यांच्या मासिक पगाराच्या १०० पट व जास्तीत जास्त रु. ४०.०० लाख पर्यंतचे विमा संरक्षण ‘विनामोबदला’ बँकेमार्फत दिले जाते. बँकेने आतापर्यंत सुमारे ७३५३ नोकरदारांसाठी आपल्या उत्पन्नातून रु. ४१.४२ लाख विमा हप्ता रक्कम विमा कंपनीकडे भरलेली आहे.
जिल्ह्यातील इतर बॅंकांमध्येसुद्धा सदरची योजना आहे. मात्र त्या योजनेचे पात्रता व निकष पाहता खूपच कमी नोकरदारांना त्याचा लाभ होऊ शकतो. तृतीय व चतुर्थ श्रेणीतील नोकरदारांना याच लाभ होत नाही. करार पद्धतीवरील अंशदान योजनेतील नोकरदारांना या योजनेत समाविष्ट करून घेतले आहे व विमा हप्ता प्रीमियम रक्कम बँक स्वतः अदा करते.
जिल्हा बँकेच्या कसाल शाखेमार्फत कसाल ग्रामपंचायत कर्मचारी कै. प्रशांत रवींद्र राणे, वय वर्ष ३४ रा. कसाल, परबवाडी यांचा अपघात विमा ‘सॅलरी प्लस’ योजनेनुसार उतरविण्यात आलेला होता. दि. ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी कसाल येथे दुचाकी व कार यांचा अपघात होऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अपघातानंतर बँकेच्या कसाल शाखेच्या शाखांव्यवस्थापक यांनी वारसास त्यांचे विमा क्लेमबाबत माहिती दिवून त्यांचेमार्फत विमा कंपनीकडे क्लेम (रु. १०,१३,८००/-) सादर केला. दि. न्यू. इंडिया अश्युरन्स कंपनीने हा क्लेम रक्कम रु.१०,००,०००/- मंजूर केलेला आहे. याव्यतिरिक्त बँकेने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा या योजनेअंतर्गत प्रत्येकी रु. २.०० लाख याप्रमाणे रु. ४.०० लाखाचा विमा क्लेम मिळवणेसाठी आवश्यक कार्यवाही सुरु आहे.
राज्य शासनाच्या दि. ०६/११/२०२० च्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन/निवृत्ती वेतन जिल्हा बँकेमध्ये जमा करण्यास मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत अन्य नोकरदारांनी जिल्हा बँकेत आपले पगार खाते सुरु करून बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँक मा. सतीश सावंत यांनी केलेले आहे.
सदर रक्कमेच्या चेकचे वितरण श्रीम. राणे यांना दि. ३० एप्रिल २०२१ रोजी बँकेचे अध्यक्ष मा. सतीश सावंत तसेच संचालक श्री. डान्टस , श्री. गवस, श्री. प्रमोद धुरी, व नीता राणे तसेच दि. न्यू. इंडिया इन्शुरन्स कंपनीचे श्री. सतीश रंजन तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरच्या रक्कमेचा क्लेम मंजूर करण्यासाठी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय अधिकारी सुजाता मालुसरे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
जिल्हा बँकेमुळे आपल्या कुटुंबाला विम्याचा आर्थिक लाभ झाला असल्यामुळे कै. प्रशांत राणेंच्या कुटूंबियांनी बँकेचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!