शीवडाव बौद्ध वाडी येथील साकव गेला चोरीला

शीवडाव बौद्ध वाडी येथील साकव गेला चोरीला

*कोकण  Express*

*शीवडाव बौद्ध वाडी येथील साकव गेला चोरीला*

*जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील शिवडाव बौध्द वाडीतील साकव चोरीला गेला आहे.एकंदरीत चौकशी करता shivadav बौद्ध वाडीतील साकव विशेष घटक योजनेतून ३०लाखाचा मंजूर झाला होता.परंतु सर्वत्र शोधाशोध करता तो साकव शिवडवमधील गावकर वाडी येथे बांधकाम चालू अवस्थेत दिसून आला आहे.

एकूण  माहितीवरून असे समजते की  जिल्हा परिषदेतील विशेष घटक योजनेतून नामांकित लोक्रतिनिधींच्या मतदार संघात ही वस्तुस्थिती आहे. बौध्द वाडीतील साकव गावकर वाडीत नेण्यामागे विशेष वजन त्यांनी खरची घातले आहे.माननीय पालकमंत्री व खासदार साहेबांनी यावर तक्रार नोंदवून सुध्दा जि. प.मुजोर अधिकारी व लोक्रतिनिधीं यांची मिलीभगत असल्याने काहीही कारवाई होत नाही.याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्री महिंद्र सावंत यांनी ग्रामविकास मंत्र्याकडे लेखी कळवून दाद मागायची ठरविले आहे,अशी माहिती श्री महिंद्र सावंत जिल्हा सरचिटणीस काँग्रेस यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!