*कोकण Express*
*फोंडाघाट गावचे सुपुत्र सुनीलदत्त ( दादा ) सुर्वे यांना “पोलिस महासंचालक पदक” जाहीर !*
*फोंडाघाट गावामधून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट गावचे सुपुत्र,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस विभागात काम करणारे पोलीस हवालदार, सुनीलदत्त नारायण सुर्वे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे “पोलीस पदक” जाहीर झाले. हे वृत्त फोंडाघाट मध्येच धडकताच आनंद व्यक्त करण्यात आला. सध्या कोरोनाच्या विस्फोटामुळे पदक वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. दरवर्षी १ मे कामगार-दिनी पोलीस विभागात सलग १५ वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणार्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक पोलीस पदक देऊन सन्मान करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुनील दत्त सुर्वे व अनुपकुमार खंडे यांची निवड करण्यात आली.सुनीलदत्त सुर्वे हे फोंडाघाट मध्ये दादा या टोपण नांवाने सुपरिचित ! त्यांनी प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण घेऊन, त्यांच्या स्वप्नाप्रमाणे पोलीस विभागात दाखल झाले. मितभाषी, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि मित्रांच्या हाकेला धावणारा तसेच वेळप्रसंगी कुणालाही सहकार्य करणारा परंतु कर्तव्यकठोर अशा स्वभावामुळे मारुतीवाडीसह फोंडाघाट गावात त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्यामुळे आपल्या पोलीसी कामात त्यांनी कधीच कुचराई केली नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण १५ वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यथोचित सन्मानास ते पात्र ठरले आहेत. त्याबद्दल सर्वांना अभिमान वाटतो अशा शब्दात गावातील विविध मान्यवरांनी, आणि संस्थांनी तसेच मित्रपरिवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे आणि अभिमानास्पद कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिले आहेत. कोरोना चे संकट संपताच त्यांचा गाव पातळीवर ही सन्मान होणार आहे.