शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या वतीने वैभववाडी आरोग्य केंद्रासाठी देण्यात आले पीपीई किट, मास्क व हॅन्डग्लोज

शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या वतीने वैभववाडी आरोग्य केंद्रासाठी देण्यात आले पीपीई किट, मास्क व हॅन्डग्लोज

*कोकण  Express*

*शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या वतीने वैभववाडी आरोग्य केंद्रासाठी देण्यात आले पीपीई किट, मास्क व हॅन्डग्लोज*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य श्री. मंगेश लोके यांच्या वतीने वैभववाडी आरोग्य केंद्रासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांच्याकडे पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी सुपूर्द करण्यात आले.

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर खांबाळे ग्रामपंचायत येथे तहसीलदार रामदास झळके, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. अनिल पवार, मंडळअधिकारी श्री. पावसकर, श्री. मंडळ अधिकारी श्री. कदम, आरोग्यसहायक श्री. चव्हाण उपसरपंच गणेश पवार, आरोग्यसेविका एस. ए. बोडेकर, आशास्वयंसेवीका प्राची पवार, दिपक पवार, अंबाजी पवार, रुपेश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!