*कोकण Express*
*कणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्ट मध्ये दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीत आज पासून सुरू असलेल्या जनता कर्फ्यू च्या काळात देखील कणकवली पटवर्धन चौकात करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये तालुक्यातील दोन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
यात भिरवंडे मधील 53 वर्षीय तर कलमठ मधील 45 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोघांनाही शिरवल येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पटवर्धन चौकातील आरोग्य विभागाच्या पथकाकडून देण्यात आली. त्यामुळे आता विनाकारण फिराल तर अशाप्रकारे पॉझिटीव्ह आल्यानंतर थेट कोविड केअर सेंटर मध्येच रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.