*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलास बळकटी, जिल्हा नियोजनातुन पोलिस खात्यासाठी नवीन वाहनांची खरेदी…*
*सिंधुदुर्ग : दि. ०१*
जिल्हा पोलीस दलास बळकटी देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजनातुन पोलिस खात्यासाठी नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन या वाहनांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.