रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट दोन दिवसात द्या – नवलराज काळे

रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट दोन दिवसात द्या – नवलराज काळे

*कोकण  Express*

*रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट दोन दिवसात द्या – नवलराज काळे*

*वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

रुग्णांचे आरटीपीसीआर रिपोर्ट उशिराने मिळत असल्याने याचा परिणाम गावातील कोरोना रुग्ण संख्या वाढीवर होत आहे. सदर रिपोर्ट दोन दिवसात उपलब्ध करण्यात यावेत या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांनी प्रा. आ. केंद्र सडुरे चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीयांका बंडगर यांना दिले आहे. जास्तीत जास्त दोन दिवसाच्या कालावधीत हे रिपोर्ट मिळणे अपेक्षित असते.

त्यात आपल्या विभागाकडून स्वॅब टेस्ट घेतलेल्या व्यक्तींना प्रिंट आउट रिपोर्ट देणे अत्यंत गरजेचे आहे. पण ते आपल्या विभागाकडून मिळत नाहीत. वैभववाडी तालुक्यामध्ये कुठेही प्रायव्हेट लॅबला स्वॅब टेस्ट होत नाहीत. पंचक्रोशीतील गावामधील बहुतांश बँकेमध्ये, शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा शासकीय विभागात काम करणाऱ्या व्यक्तींना निगेटिव रिपोर्ट आपल्या विभागाला दाखवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कामावरती घेतलं जात नाही. काही ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन देखील निगेटिव्ह रिपोर्ट ची मागणी करत आहे. निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच लग्नकार्याला इतर कोणत्याही कार्याला कोविड स्वॅब टेस्ट निगेटिव असलेल्या रिपोर्टची अट घालून कार्यक्रमाना हरकत दाखला देण्यात येत आहेत.

त्यामुळे या ग्रामस्थना आप आपल्या विभागांमध्ये रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. तरी माझी आपल्याकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे, की, प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे येथे जो व्यक्ती स्वॅब देतोय त्याला किमान दोन दिवसाच्या आत रिपोर्ट उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून त्या ग्रामस्थांची अडचण दूर होईल. रिपोर्ट लवकर मिळाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यास सोपे जाईल असे निवेदनात काळे यांनी म्हटले आहे. वरील सर्व मागण्या वरिष्ठांना कळवून तातडीने पुर्ण करण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. यावेळीशिराळे भाजपा युवा मोर्चा बूथ अध्यक्ष संकेत शरद पाटील, ॲड. विक्रमसिंह विजयसिंह काळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!