*कोकण Express*
*आमदार नितेश राणे ठरताहेत सिंधुदुर्गातील कोविड रुग्णांसाठी देवदूत!*
*आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गासाठी पाठवले जंबो ऑक्सिजन सिलेंडर*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा पाहता परत एकदा आमदार नितेश राणे मदतीला धावून आले आहेत. सिंधुदुर्गासाठी १५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध केले आहेत. पुण्यावरून भरलेले जंबो सिलेंडर घेऊन गाडी आज सिंधुदुर्गाकडे रवाना झाली.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता असल्याने याआधी आमदार नितेश राणे यांनी १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॅन सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयला पाठवले. ज्याच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना फायदा होत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याच्या घटना राज्यात रोज घडत असून, अशी वेळ सिंधुदुर्गातील रुग्णांवर येऊ नये यासाठी येत्या दिवसांत आणखी जंबो सिलेंडर सिंधुदुर्गासाठी पाठवणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात आमदार नितेश राणे यांनी केलेल्या या मदतीमुळे नक्कीच अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत..