*कोकण Express*
*लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्याकरीता नियोजन करा*
*मनसे अध्यक्ष आशिष सुभेदार यांची प्रशासनाकडे मागणी*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
सध्या सुरू असलेल्या नियोजनशून्य लसीकरण कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून लसीकरण केंद्रावर लोकांच्या होणार्या गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन नियोजनबद्ध लसीकरण कार्यक्रमातून त्यानुसार उपाययोजना करून कार्यक्रम राबवावा अशी मागणी मनसेच्या वतीने सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.