दत्ता सामंत यांनी कोविड केअर सेंटरला स्वखर्चाने उपलब्ध केली सव्वा लाखांची औषधे

दत्ता सामंत यांनी कोविड केअर सेंटरला स्वखर्चाने उपलब्ध केली सव्वा लाखांची औषधे

*कोकण Express*

*दत्ता सामंत यांनी कोविड केअर सेंटरला स्वखर्चाने उपलब्ध केली सव्वा लाखांची औषधे*

*गरज पडल्यास स्वखर्चाने डॉक्टरही उपलब्ध करून देऊ*

*रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू*

*सामंत यांचा प्रशासनास शब्द*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण कुंभारमाठ तंत्रनिकेतन येथील ७५ बेडच्या शासकीय कोविड केअर सेंटर येथे औषधांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती उद्योजक तथा भाजप नेते दत्ता सामंत यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार कोविड सेंटर येथील रुग्णांना आवश्यक असणारी सुमारे सव्वा लाख किमतीची औषधे स्वखर्चातुन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत. दत्ता सामंत यांच्या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याच्या सोबत आता काही ठिकाणी औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. औषधां अभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्णांना योग्य उपचार वेळेत उपलब्ध व्हावेत या उदात्त हेतूने सामंत यांनी सुमारे सव्वा लाखांची औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

कोविड सेंटरमध्ये जादा रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता पंचायत समिती प्रशासन अधिक एक रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे. मात्र चालक मानधन व इंधन खर्च याचा महिन्याचा सुमारे २५ ते ३० हजार पेक्षा जास्त खर्च आहे. त्याची तरतुद अद्याप झाली नाही. प्रशासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. यावेळी दत्ता सामंत यांनी चालक मानधन व गाडी इंधनखर्च मी स्वतः देतो, मात्र तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करा असे प्रशासनास सांगितले. त्याबरोबर कोविड सेंटर येथे रुग्णांना गरम पाणी, काढा तयार करण्यासाठी गॅस व शेगडीही तात्काळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही सामंत यांनी दिली.

यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. कोविड काळात जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या शासकीय, कंत्राटी अधिकारी कर्मचारी दिल्या जाणाऱ्या मानधनाचा विचार करता ते अपुरे व कमीच आहे. काही वेळा मानधन वेळेतही मिळत नाही. तरीही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र चांगली सेवा देत आहे.

ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना लक्ष ठेवण्यासाठी सतत डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र सध्याची स्थिती अनेक रुग्ण व त्या तुलनेत अपुरे डॉक्टर अशी आहे. याचा विचार करता वेळ पडल्यास आपण स्वतः खाजगी स्तरावर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यास तयार आहोत, त्यांच्या योग्य मानधनाचा खर्च मी स्वतः उचलेन, रुग्णांना योग्य उपचार व त्यांचे जीव वाचणे हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. अशी भावना सामंत यांनी व्यक्त केली.

यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. तृप्ती देसाई, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी डॉ. सुरज बांगर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, आरोग्य सेवक एल. सी. नातेवाड यासह मधुकर चव्हाण, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, मंदार लुडबे, मनोज वाटेगावकर, राजू साळगांवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!