*कोकण Express*
*नुसती मागणी करून लोकांचे जीव वाचत नाही..*
*कुडाळ/प्रतिनिधी:-*
शिरसाट म्हणाले काही तथाकथित पुढारी घरात बसुन चमकेगिरी करुन सोशल मिडीया द्वारे आपण खुप काही करतो असे भासवून रोज ही मागणी ती मागणी शासनाने हे केले शासनाने ते केले अशा बढाया मारत प्रसिद्धी मिळवत आहेत यावर शिरसाट यांनी या चमकेगिरी करणा-या पुढचा-यांचा समाचार घेताना सांगितले घरात बसून आणि प्रसिद्धी घेऊन मागण्या करणे सोपे असते परंतु ग्राऊंड लेवलवर काम करणे फार कठिण असते
खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत, आमदार वैभव नाईक ज्या पध्दतीने कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता काम करतात त्यासाठी कौतुक नको पण निदान काम करणा-या व्यक्तीला निरुत्साह तरी करु नका असे सांगुन नुसत्या सोशल मिडीया वर एखादी मागणी करुन मिळत नाही तर त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो असे सांगुन नुसती चमकेगिरी करुन टीका टीपणी करुन लोकांचे जिव वाचणार नाहीत तर सहकार्याची भुमिका ठेवा, कलुषित वातावरण करु नका असा सल्ला श्री शिरसाट यांनी दिला.