*कोकण Express*
*कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी जिल्हा काँग्रेसकडून “कोविड मदत केंद्र” सुरू…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोना काळात रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना सेवा देण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून “कोविड मदत केंद्र” उभारण्यात आले आहे.ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज आहे,त्यांनी संबधित कार्यकर्ते अथवा पदाधिकार्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
यात असे म्हटले आहे की,जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केले आहे.या संकटाच्या काळात कोव्हिड रुग्णाना मदत करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने पुढाकार घेतला असून कोविड मदतकेंद्राची स्थापना केली आहे.तसेच कोव्हिडच्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे.तरी गरजू रुग्णानी व त्यांच्या नातेवाईकांनी याचा लाभ घ्यावा,तसेच मदतीसाठी मदतकेंद्राशी संबंधित पदाधिकारी इर्शाद शेख 9404598091,समीर वंजारी 9822454023,राजेंद्र मसूरकर 9422435760,विजय प्रभू 8888008112, किरण टेंबूलकर 9422580275,विधाता सावंत 9422077515 यांच्याशी अथवा सावंतवाडी तहसील समोरील काँग्रेसच्या कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहनही श्री.गावडे यांनी केले आहे.