*कोकण Express*
*कणकवली न.पं.च्या १० दिवसांच्या जनता कर्फ्युला रिक्षाचालक-मालक संघटनेचा पाठिंबा!*
*संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा कोदे यांची माहिती!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या जनता कर्फ्यू ला सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटना संघटनेकडून संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. नगरपंचायतीने योग्य वेळी हे पाऊल उचलले असून, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना कणकवली तालुक्यातील रिक्षाचालक-मालक यांच्याकडून नगरपंचायत ला पूर्णपणे सहकार्य राहणार असल्याचेही श्री कोदे यांनी सांगितले. तसेच कणकवली शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन हा दहा दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी करा असे आवाहन श्री कोदे यांनी केले आहे.