सावंतवाडी रास्त धान्यदुकानदार संघटना राज्यस्तरीय बंदमध्ये सहभागी होणार

सावंतवाडी रास्त धान्यदुकानदार संघटना राज्यस्तरीय बंदमध्ये सहभागी होणार

*कोकण Express*

*सावंतवाडी रास्त धान्यदुकानदार संघटना राज्यस्तरीय बंदमध्ये सहभागी होणार…*

*पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; १ मेपासून तालुक्यातील धान्य व केरोसीन दुकाने बंद…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा देणाऱ्या रास्त धान्य दुकानदाराच्या मागण्याबाबत शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यस्तरीय संघटनेने घेतलेल्या धान्य वितरण बंदमध्ये सावंतवाडी रास्त धान्यदुकानदार संघटना सुद्धा सहभागी होणार आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर १ मे पासून तालुक्यातील एकही धान्य व केरोसीन दुकान सुरू राहणार नाही,अशी माहीती संघटनेचे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांनी दिली. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे सचिव संजय मळीक पंढरीनाथ गावकर उदय फेंद्रे तन्वी परब, संगीता कोकरे, भास्कर सावंत, प्रवीण गवस, शिवा लाड, रोहिणी गावडे, अनिकेत रेडकर, शिवराम गाड,संतोष देवगुरव आदी उपस्थित होते.
यावेळी रुपेश राऊळ म्हणाले,
राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदार कोव्हीड – १९ कोरोना या महामारीच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानधारकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळताही राज्यात कोरोना महामारीच्या काळात भूकबळी होऊ नये म्हणून अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता धान्य वाटप केलेले आहे, मोफत धान्यही शासन नियमाप्रमाणे गावागावात वाडीवस्तीवर नेऊन वाटप करण्यात आले, मात्र त्यावेळेचे गाडी भाषेची अद्याप मिळालेले नाही याबाबत शासनाला सर्व कल्पना असुनही केवळ ईपास मशीन वर कार्ड धारकाचे थम न घेता धान्य दुकानदारांच्या थमने धान्य वाटपास परवानगी मिळावी या मागणीला शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, यासाठीच राज्यस्तरीय संघटनेकडूननाईलाजास्तव १ मे २०२१ पासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांचे धान्य वितरण व वाटप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या राज्यस्तरीय संपात तालुक्यातील धान्य दुकानदार संघटना सहभागी झाली होणार असुन १ मे तालुक्यातील सर्व धान्य दुकाने केरोसीन दुकाने बंद राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!