*कोकण Express*
*स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना वैभववाडी अध्यक्षपदी विजय तावडे यांची निवड.*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना वैभववाडी अध्यक्षपदी विजय उर्फ बाबू तावडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नकाशे यांनी निवडीचे पत्र श्री. तावडे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यावेळी कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, वैभववाडी माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, धनंजय हेर्लेकर, योगेश गुरव, संतोष गिरी, संतोष राठोड व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.