🏦 बँक ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आरबीआय पुढच्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंट्ससाठी नियम बदलणार आहे.
💁♀️ आरबीाय बँकिंग फसवणूकीच्या प्रकारांवर चाप बसवण्यासाठी Positive Pay System घेऊन येणार आहे. या सिस्टिम मध्ये 50 हजारांहून अधिक रक्कमेच्या पेमेंटची पुष्टी करण्यासाठी काही मुख्य माहिती द्यावी लागणार आहे
💁♂️ आरबीआयच्या या नव्या कार्यप्रणाली बद्दल अधिक माहिती:
▪️5 लाखांहून अधिक रक्कमेच्या पेमेंटसाठी बँक ही सिस्टिम अनिवार्य करु शकते.
▪️Positive Pay System अंतर्गत चेक देणाऱ्याला त्या संबंधित माहिती जसे- तारीख, कोणाला द्यायचा आहे त्याचे नाव, कोण देणार आणि रक्कम यासाठी इलेक्ट्रॉनिक रुपात एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या माध्यमातून द्यावे लागणार आहे.
▪️पेमेंटपूर्वी चेक कोणत्या कारणासाठी वापरला जात आहे त्याचे क्रॉस चेकिंग होणार आहे.
▪️काही चुक आढळल्यास त्यावर योग्य उपाय केले जाणार आहेत.
▪️नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) CTS मध्ये सकारात्मक पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामध्ये सामील असणाऱ्या बँकांचा सुद्धा त्याची सुविधा मिळणार आहे. यानंतर बँक 50 हजार किंवा त्याहून अधिक रक्कमेसाठी खातेधारकांना या सुविधेसाठी सक्षम बनवणार आहेत.