*कोकण Express*
*पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला गर्दी करु नये…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी येत्या दि.१ मे रोजी पालकमंत्री उदय सामंत भेट देणार आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील मात्र कार्यकर्त्यांनी गर्दी टाळवी तसेच निवेदने आणू नये, असे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत केअर सेंटर आणि पायाभूत सुविधा बाबत सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये बैठक घेऊन आढावा घेणार आहेत तसेच अधिकाऱ्यांची चर्चाही करणार आहेत असे श्री राऊळ म्हणाले. या बैठकीसाठी पक्षाच्या मान्यवर कार्यकर्त्यांनी निवेदन घेऊन येऊ नये किंवा उपस्थिती दर्शवून नये कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझर हे महत्त्वाचे सूत्र आहे असे राऊळ यांनी सांगून पालकमंत्री यांनी तसे आवाहन केले आहे सध्या लोक कोविडच्या पार्श्वभूमीवर अडचणीतून जात आहेत त्याबाबत पालकमंत्री सामंत आढावा घेऊन नियोजन करणार आहे तसेच जरूर तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत असे राऊळ म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यासाठी कायमच प्राधान्य दिले असून ते कोविडच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.या दरम्यान पालकमंत्री सावंतवाडी आणि दोडामार्ग मध्ये भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठकीमध्ये नियोजन करून निर्णय घेणार आहेत असे राऊळ म्हणाले.