*कोकण Express*
*नरडवेत आढळला अर्धवट जळालेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील नरडवे-भेर्देवाडी येथे जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला आहे.
नरडवे भेर्देवाडी येथे अज्ञाताचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. तात्काळ डीवायएसपी डॉ कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला , पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे ३० वर्षे वयाच्या युवकाचा मृतदेह पूर्ण जळालेल्या अवस्थेत होता. पाय आणि पोटाचा काही भाग सोडला तर पूर्ण शरीर जळालेले होते. प्राथमिक पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टेम साठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र त्या युवकाची ओळख पटवून नेमकी दुर्घटना कशी घडली ? त्या युवकाने जाळून घेतले ? की त्याला कोणी जाळले ? याचा शोध कणकवली पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे करत आहेत.