*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / २९ एप्रिल गुरवार*
◾ राज्यात मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाही- त्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
◾ कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या – केंद्र व राज्य सरकारला वेगवेगळ्या दरात लस विकत आहेत –
◾ हा भेद दूर करून संपूर्ण देशात ही लस १५० रुपयांला करा – अशी मागणी करणारी जनहित याचिका – काल उच्च न्यायालयात दाखल झाली
◾ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे – सरकार आणि तेल कंपन्या , एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम करीत आहेत –
◾ या सुविधेनंतर काही दिवसांत – आपण कोणत्याही एजन्सीकडून घरघुती सिलिंडर घेऊ शकाल – तसेच कोणत्याही एजन्सीकडून ते सिलिंडर पुन्हा भरून मिळेल
◾ अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूने कोरोना लस तयार केली – दरम्यान आता अदर पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा – मोठा निर्णय काल गृहमंत्रालयाने घेतला –
◾ त्यानुसार सिक्युरिटी फोर्सेसचे ११ जवान ,त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील – दरम्यान आता सीरमची कोविशिल्ड ही लस – आता ४०० ऐवजी ३०० रूपयांना दिली जाणार – असे काल अदर पूनावाला यांनी जाहीर केले
◾ 21 मे पासून सीए फायनल आणि इंटरमिजीएटची परीक्षा सुरु होणार होती – मात्र आता हि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
◾ राज्यात कोरोना मृत्यू दर 1.5 टक्के इतका आहे – तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के इतके झाले आहे
◾ महाराष्ट्रातला लॉकडाऊन 15 दिवसाठी वाढवावा लागेल – असं कॅबिनेटमधल्या सर्वांचं मत आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती