*कोकण Express*
*अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; ३२ लाखाची दारू जप्त!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील गड नदीजवळ असलेल्या कळसुली फाट्यावर राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्गच्या कणकवली पथकाने कारवाई करत अवैध दारू वाहतुक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. यात उत्पादन शुल्क विभागाने 32 लाख 40 हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.
दरम्यान, सदर ट्रक मधे व्हिस्कीच्या एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे ४५० बॉक्समध्ये १८० मिली मापाच्या १ ९२०० सिलबंद बाटल्या आढळल्या असून अवैध दारू व ट्रक मिळून सुमारे ४३,४१,००० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत ट्रकच्या चालक कृष्णा दुलराम शितोळे (वय ३२) रा. मध्यप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमध्ये कणकवली येथील दुय्यम निरीक्षक जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ लक्ष्मण राणे, एस. एस. चौधरी, वाहनचालक मुपडे, स्नेहल कुवेसकर, श्री . खान, साजीद शहा सहभागी होते. तर सदर गुन्ह्याचे पुढील तपासकाम राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्गचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी करत आहेत.