*कोकण Express*
*आधी रक्तदान करा नंतर लस घ्या …*
*शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे आवाहन*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वानाच कोव्हीड ची लस देण्यात येणार आहे. मात्र लस घेतल्यानंतर पुढील 60 दिवस रक्तदान करता येणार नाही. सिंधुदुर्गात ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असून लस घेण्याआधी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केले आहे.
सध्या राज्यभरासह जिल्ह्यातही कोरोनाचा फैलाव वाढत चालला असून प्रशासनासमोर हा वाढता फैलाव रोखण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दररोज होणारी कोरोना रुग्णांची वाढ आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आणत आहे. त्यात पुन्हा रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडाही भासू लागला आहे. त्यामुळे इच्छुकांनी रक्तदान करावं, असं आरोग्य यंत्रणेमार्फत सांगण्यात आलं आहे. परंतु येत्या १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसिकरणाला सुरुवात होत आहे. याकाळात १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. मात्र एकदा लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस म्हणजेच दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करावं नंतरच लस घ्यावी, असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांनी केले आहे.