🍱 साहित्य :
👉 1/2 कप फ्लॉवर (फुलकोबी), 1/2 कप फरसबी, 1/2 कप गाजराचे काप, 1/2 कप शिमला मिरची चिरलेली, 1/2 कप बटाट्याचे तुकडे, 1/4 कप तेल,1 लहान कांडी दालचिनी, 1 वेलची, 2 लवंगा, 1/4 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीपुरती.
🥘 मिक्स व्हेजची ग्रेव्ही बनविण्यासाठी लागणारे साहित्य –
👉 2 1/2 कप टॉमेटोचे तुकडे, 1 कप कांद्याचे तुकडे, 2 चमचे काजू, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे आलं जाडसर चिरलेला, 3 चमचे तुकडे केलेली वाळकी काश्मिरी लाल मिरची.
👩🍳 कृती –
🔸 मिक्स व्हेज भाजीसाठी ग्रेव्ही बनविण्याची कृती –
1) एका भांड्यात सर्व साहित्यासह 2 कप पाणी घाला, चांगल्या प्रकारे मिसळा आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे अधून मधून हालवून शिजवावं. नंतर गार होण्यासाठी ठेवावं.
2) गार झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक दळून वाटणं करावं. बाजूस ठेवून द्या.
🔸 मिक्स व्हेज भाजी बनविण्यासाठीची कृती –
1) मिक्स व्हेज भाजी बनविण्यासाठी, एका पॅन मध्ये तेल गरम करा, त्यामध्ये फ्लॉवर, फरसबी, गाजर, शिमला मिरची, आणि बटाटे घाला आणि गॅस मोठा करून 3 ते 4 मिनिटे भाज्यांचा रंग तांबूस होईपर्यंत परतून घ्या.
2) गॅस बंद करून द्या, भाज्यांना एका भांड्यात काढून घ्या आणि एका बाजूस ठेवून द्या.
3 आता त्याच पॅन मध्ये तेल टाकून गरम करा, त्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग आणि ग्रेव्हीच मिश्रण घाला. चांगल्या प्रकारे मिसळा आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे ढवळत राहा जो पर्यंत त्या मधून तेल सुटत नाही.