यापुढे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत ड्युटी नाही; आम.नितेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी!

यापुढे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत ड्युटी नाही; आम.नितेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी!

*कोकण Express*
*यापुढे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत ड्युटी नाही; आम.नितेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी!*
*चालक-वाहक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने मुंबईत पाठवू नये म्हणून आम. राणेंचे होते प्रयत्न!*
*मुंबईत सुरू असलेल्या २५ गाड्याही सिधुदुर्ग जिल्ह्यात परतणार; प्रभारी विभागनियंत्रक कांबळे यांची माहिती!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येक आठवड्यात शंभर एसटी कर्मचारी मुंबईत ड्युटीला पाठवून देण्याचा निर्णय आज आमदार नितेश राणे यांनी विभागनियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याशी चर्चा केल्यानंतर मागे घेण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे यांनी एसटी महामंडळाच्या मुख्यसचिवांशी बोलून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईत असलेल्या पंचवीस गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत पाठविण्याची मागणी केली होती, ती ही एसटी महामंडळाने मान्य केली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईत सुरू असलेल्या २५ गाड्या सिधुदुर्ग जिल्ह्यात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईत एसटीच्या ड्रायव्हर-कंडक्टर ना मुंबईत ड्युटीसाठी जावे लागणार नाही. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी केलेल्या या यशस्वी मध्यस्थीमुळे कर्मचार्यांवरील कोरोनाचे संकट टळले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार राणे यांचे आभार मानले आहेत.
कोरोना काळात मुंबईत एसटी बस सुरू ठेवून त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभर कर्मचाऱ्यांना दोन शिप्ट च्या ड्युटीसाठी दर आठ दिवसांनी पाठविले जाते.या संदर्भात भाजपा पक्षाच्या वतीने सातत्याने निवेदने देऊन मुंबईत कर्मचारी पाठवू नका अशी एसटी महामंडळाला विनंती करण्यात आली होती.त्याच प्रमाणे एसटी कामगार संघटना यांनीही निवेदने दिली होती.त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी फोनवरून वरिष्ठ स्थरावर चर्चा केली होती.आज या बाबतीत पुन्हा आमदार नितेश राणे यांनी फोन वरून चर्चा केली असता प्रभारी विभाग नियंत्रक श्री.कांबळे यांनी आजपासून कर्मचारी मुंबईत न पाठविण्याचे मान्य केले.त्याच प्रमाणे महामंडळाने या निर्णयाप्रमे मुंबईत असलेल्या कर्मचाऱ्यांना २५ गाड्यासह मागे पाठविण्याचे मान्य केले आहे.तसे आपल्याला कळविले असल्याचे विभाग नियंत्रक कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!