*कोकण Express*
*कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला मंजुरी*
*आमदार वैभव नाईक यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नगरपंचायतच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी मंजुरी दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. गेले काही दिवस हे कोविड केअर सेंटर सज्ज असून देखील मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. याबाबत नुकतीच अधिकाऱ्यानी देखील या कोविड केअर सेंटरची पाहणी केली होती.काल मंगळवारी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पंधरा दिवस उलटले तरी या कोविड केअर सेंटरला मंजुरी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून उदासीन भूमिका असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी या कोविड केअर सेंटरला मंजुरी दिल्याची माहिती दिली. त्यामुळे आता हे सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

