*कोकण Express*
*अस्तित्व नसलेल्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये*- *विजय चिंदरकर*
भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री या वर मनसे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केलेली टीका ही बालिश वृत्तीची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे चे अस्तित्व आणि त्यांची कार्यपद्धती सर्व जनतेला माहीत असून जिल्ह्यात आपला पक्ष या वाईट वृत्तीमुळे वाढत नाही ना ? याचे आत्मपरीक्षण मनसे नेत्यांनी करावे.
उगाच खोट्या तक्रार करून अधिकारी वर्गाला ब्लॅकमेल करणे, माहिती अर्जात माहिती मिळवून त्रुटी शोधणे आणि राजकारण हे उपजीविका साधन करणे हे दया मेस्त्री यांना उपजत आहे. या पूर्वी एका ढाबे मालकाकडे खंडणी मागण्यावरून दया मेस्त्री यांना अटक ही झाली होती.
आमदार नितेश राणे यांचे झंझावाती काम, भारतीय जनता पार्टी चे प्रत्येक निवडणूक मधील यश न बघवल्याने काही डोमकावळे पक्षातील लोकांवर टीका करीत आहेत. मिलिंद मेस्त्री यांच्या वर डॉक्टर संदर्भात केलेले आरोप खोडसाळ आहेत,जर मिलिंद मेस्त्री यांच्या तक्रारी घेऊन पाटील उपरकर यांच्या कडे आले होते तर तक्रार का केली नाही? की यामधून तुमची सेलमेंट चा मुद्दा होत नसल्याने आवाज उठवला नाही.सर्वांना डॉक्टर मृत्यू झाल्यावर च याचा राजकारण साठी मुद्दा केला जातो हे दुर्दैव आहे.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील अध्यक्ष चे काम आदर्शवत आहे. त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा जिल्हा परिषदकडे लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन आल्यास जिल्हा परिषद त्यांना नक्कीच मदत करेल.
काही महिन्यांपूर्वी हुंबरट येथे वाळूचे ट्रक दया मेस्त्री यांनी आडऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला होता मात्र सजग गावाने आणि डंपर मालक जमून सज्जड दम दिल्यावर पलायन केले होते.
या पुढे दया मेस्त्री यांनी भारतीय जनता पार्टी च्या कोणत्याही पदाधिकारी वर टीका केल्यास संपूर्ण कुंडली बाहेर काढू असा इशारा कलमठ शक्ती केंद्र प्रमुख विजय चिंदरकर यांनी दिला आहे.