*कोकण Express*
*कणकवली न.पं. प्रशासनाने कोविड सेंटरच्या सोयी – सुविधासाठी जिल्हा प्रशासनावर अवलंबून राहू नये!*
*माजी उपनगराध्य कन्हैया पारकर*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला प्रशासनाकडून मान्यता देण्यास वेळकाढूपणा होत असल्याचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले होते. यावर कणकवली न.पं. प्रशासनाने कोविड सेंटरच्या सोयी – सुविधासाठी जिल्हा प्रशासनावर अवलंबून राहू नये तर कोविड सारख्याच महामारीत नगरपंचायतच्या न.पं.फंड, 14 वित्तआयोग तथा नगरोद्यान मधून कोविडसाठी निधी खर्च करावा. तसेच नगरपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी या निधीतून डॉक्टर, नर्स व इतर स्टाफचा तात्काळ भरणा करावा जेणेकरून शहरातील नागरिकांना कोविड सारख्या महामारीत इतरत्र जावे लागणार नाही. तसेच कणकवलीतील कोविड सेंटरला आपले सहकार्य असून प्रशासनावर अवलंबून न राहता तातडीने नेमणूक करून मुख्याधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. सोबत न.पं.ने आपली भूमिका पार पाडत कणकवली शहर वसीयांना योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी माजी उपनगराध्य कन्हैया पारकर यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे निवेदनव्दारे केली आहे.