*कोकण Express*
*कणकवली शहरातील प्राथमिक शाळांमध्ये कोरोना लसीकरण केंद्र चालू करा : अण्णा कोदेे*
*प्रांताधिकारी-यांकडे मागणी ; उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर गर्दी होत असल्याने गैरसोय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील लोकसंख्येचा विचार केल्यास कणकवली शहरातील स्वतंत्र लसीकरण केंद्र असणे गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी मोठी गर्दी होते.त्यामुळे लस घेण्यास रांगा लागता. गर्दीमुळे गैरसोय होते.आरोग्य यंत्रणेवर ताण येतो, त्यासाठी कणकवली शहरातील जि.प. शाळा क्र . १ ते ६ चा वापर करून येथे लसीकरण केंद्र चालू करावे अशी मागणी भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी प्रांताधिकारी यांचे कडे केली आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात काल एकाच वेळी लस घेण्यासाठी कणकवली शहर आणि ग्रामीण अशा लोकांची गर्दी झाली होती.कणकवली शहराचा विचार करता नगरपंचयत हद्दीतील प्राथमिक शाळांमध्ये कोरोना लस देण्यासाठी केंद्र सुरू करावे जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल आणि एकाच ठिकाणी होणारी गर्दी होणार नाही.त्याच प्रमाणे कोरोनाचा प्रसार होण्याची भीतीही राहणार नाही अशी असे आण्णा कोदे यांनी प्रांताधिकारी यांना कळविले आहे.